Ad will apear here
Next
‘महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा’
गावातील ग्रामस्थांसाठी ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजनजालना :  ‘महिलांनी संघटित होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावावा,’ असे आवाहन भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील राजूर (गणपतीचे) येथे जालना जिल्हा माहिती कार्यालय, कै. श्रीरंगराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सहारा युवा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन तालुक्यातील बाणेगाव, चांदईएक्को, चांदई टेपले, चांदई ठोंबरे, लोणगाव आदी गावातील ग्रामस्थांसाठी आयोजित ‘ग्रामसंवाद’ या कार्यक्रमात गवळी बोलत होते.

या वेळी भोकरदनच्या तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक, औरंगाबादच्या बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड सा. मा. पंडित, राज्य महिला आयोगाचे तालुका समन्वयक ॲड. पी. जे. गवारे, राजूरचे सरपंच मुसासेठ सौदागर, विस्तार अधिकारी सूर्यवंशी, बी. एस. सय्यद, माहिती सहायक अमोल महाजन, राजूर संस्थानचे गणेश साबळे, तायडे, राजेंद्र भिंगारे, शिवाजी तायडे, श्रीमती मापारी आदी उपस्थित होते.

‘महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध उद्योगांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाच्या आधारावर महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय उभारावेत. कर्जप्रकरणात काही अडचणी आल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा,’ असे गवळी यांनी सांगितले.

तहसीलदार चित्रक म्हणाल्या, ‘ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित न राहता बदलत्या युगात कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील महिलांचा विकास झाला, तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास होईल. यासाठी महिलांनी सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक स्तर उंचावावा.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZYZBD
Similar Posts
‘द मोदी इयर्स’ पुस्तकाचे प्रकाशन जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशावर परिणाम करणाऱ्या १२ महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या ‘द मोदी इयर्स’ या पुस्तकाचे नुकतेच येथे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, या पुस्तकाचे संपादक भगवान दातार आदी मान्यवर उपस्थित होते
लघुउद्योजक पुरस्कार प्रदान जालना : जालना येथील रमेश गायकवाड यांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लघुउद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भूमी संस्थेच्या वतीने अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष रमेश गरुड, संस्थेचे सचिव सुरेश ताजणे, बाळू नामदे, सुधीर जोगास, किरण मांदले, स्वप्नील
झाड हलवून वाहतूक सुरळीत जालना : जाफ्राबाद तालुक्यात २४ जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वेळी माहोरा रोडवर एक मोठे झाड पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जाफ्राबाद तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले आमदार संतोष पाटील-दानवे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ शासकीय यंत्रणांना कळवून झाड बाजूला
विशेष महिला जाहीरनामा - माधवी नाईक भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चातर्फे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ''विशेष महिला जाहीरनामा'' मुंबईत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा ॲड.माधवी नाईक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये तसेच महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते, त्यांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language